सामान्य प्रश्न

केवायसी म्हणजे - नो युवर कस्टमर (तुमचा ग्राहक जाणा/ओळखा). ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे, बँका त्यांच्या ग्राहकांची ओळख व पत्ता ह्याची माहिती मिळवितात. ह्या प्रक्रियेमुळे, बँकांच्या सेवांचा गैरवापर केला जात नसल्याबाबत खात्री होते. खाती उघडतेवेळी बँकांनी केवायसीच्या कार्यरीती पूर्ण करणे आवश्यक असते. ग्राहकांचा केवायसी तपशील नियतकालिकतेने अद्यावत करणेही बँकांसाठी आवश्यक आहे.

बँक खाते उघडण्यासाठी, एका अलिकडील छायाचित्रासह, ओळखीचा एक पुरावा व पत्त्याचा पुरावा सादर करावा लागतो.

ओळखीचा पुरावा देण्यासाठी, भारत सरकारने, ‘अधिकृत वैध कागदपत्र’ (ओव्हीडी) म्हणून सहा कागदपत्र अधिसूचित केले आहेत. हे सहा दस्त म्हणजे, पारपत्र, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, युआयडीएआयने दिलेले आधार कार्ड व एनआरईजीए जॉब कार्ड. ओळखीचा पुरावा म्हणून ह्यामधील कोणतेही दस्त सादर करता येईल. ह्या कागदपत्रांमध्ये तुमचा पत्ता दिलेला असल्यास, ते पत्त्याचा पुरावा म्हणूनही स्वीकारले जाऊ शकतात. ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रात तुमचा पत्ता नसल्यास, तुम्हाला, तुमचा पत्ता असलेले आणखी एक अधिकृतरीत्या वैध दस्त सादर करावे लागेल.

होय. तुम्ही तुमचे अलिकडील छायाचित्र देऊन व बँक अधिका-याच्या उपस्थितीत तुमची सही करुन किंवा अंगठ्याचा ठसा उमटवून छोटे खाते (स्मॉल अकाऊंट) नावाचे बँक खाते उघडू शकता.

होय. स्मॉल अकाऊंट्सवर काही मर्यादा आहेत. • ह्या खात्यातील शिल्लक कोणत्याही वेळी रु.50,000/- पेक्षा अधिक असू नये. • एका वर्षातील एकूण जमा (क्रेडिट) रु.1,00,000/- पेक्षा अधिक असू नये. • एका महिन्यातील एकूण निकासी व हस्तांतरणे रु.10,000/- पेक्षा अधिक असू नयेत. • ह्या खात्यांमध्ये विदेशातून आलेली प्रेषणे जमा करता येणार नाहीत. अशी खाती, सुरुवातीला 12 महिन्यांपर्यंत कार्यान्वित असतात व त्यानंतर, असे खाते उघडल्यानंतर बारा महिन्यांच्या आत, त्या खातेदाराने, अधिकृतरीत्या वैध कागदपत्रांसाठी अर्ज केला असल्याचा पुरावा सादर केल्यास, ते खाते आणखी बारा महिन्यांसाठी कार्यान्वित राहू शकते.

केवायसीसाठीचे आवश्यक कागदपत्र तुम्ही सादर न केल्यास, बँक तुमचे खाते उघडू शकणार नाही.

होय. ओळख व पत्ता ह्या दोन्हींचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारण्यात येते.

नाही. तुम्ही आधार कार्ड किंवा इतर पाच ओव्हीडी, खाते उघडण्यासाठी देऊ शकता.

खाते उघडणे, रु.50,000/- च्या वरील रकमेचे (रोख असलेले किंवा नसलेले) व्यवहार इत्यादींसाठी पॅन नंबर देणे आवश्यक आहे. पॅन नंबर देणे आवश्यक आहे अशा व्यवहारांची संपूर्ण यादी, आय कर विभागाच्या वेबसाईटवरुन पुढील युआरएलवर मिळविता येते. http://www.incometaxindia.gov.in/_layouts/15/dit/pages/viewer.aspx?grp=rule&cname=CMSID&cval=103120000000007541&searchFilter=&k=114b&IsDlg=0

होय. क्रेडिट/स्मार्ट कार्डे आणि अ‍ॅड ऑन/पूरक कार्डांसाठीही केवायसी प्रक्रिया आवश्यक आहे. केवळ खातेदारांनाच डेबिट कार्डे दिली जात असल्याने आणि केवायसी पूर्ण झाल्यावरच खाती उघडली जात असल्याने डेबिट कार्डे देण्यासाठी वेगळ्याने केवायसी करण्याची गरज नाही.

1800 233 2393 ह्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुम्हाला मोबाइल बँकिंग सर्विस थांबवता येईल.

तुमची प्रतिदिवस व्यवहार मर्यादा ही IMPS व ADCC बँक अंतर्गत Rs 50000 असून NEFT व RTGS साठी कोणतीही मर्यादा नाही.

तुम्ही TPIN न वापरता तुमच्या अकाऊंट चे बॅलेन्स, खाते उतारा, शाखा,एटीएम दर्शक व इतर सेवांचा लाभ घेऊ शकता. TPIN मिळवण्यासाठी जिल्हा बँकेच्या शाखेला संपर्क करा. किंवा इतर माहिती साठी 1800 233 2393 वर कॉल करा.

IMPS ने रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी लाभर्थ्याची लागणारी माहीती खालील प्रमाणे आहे. A ) लाभार्थ्याचे नाव B ) लाभार्थ्याचा खाते क्रमांक C ) लाभार्थ्याचा IFSC कृपया वरील माहिती तुम्हाला लाभार्थी जोडा ह्या ऑप्शन मध्ये जाऊन जोडावी लागेल.

लाभार्थी जोडा मध्ये अ‍ॅड केलेल्या लाभार्थ्याला अ‍ॅड होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नाही. अ‍ॅड केल्या बरोबर तुम्ही रक्कम ट्रान्सफर करू शकता.

हो, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन हे बँकेने पूरविलेली पुर्णपणे सुरक्षित यंत्रणा असून आपल्या मोबाइल वर कोणत्याही प्रकारची माहिती संग्रहीत करण्यात येत नसून मोबाइल आणि बँक दरम्यान डेटा प्रवाह सुरक्षित केलेला आहे.

आमच्याशी संपर्क साधा

नवीनतम बातम्या आणि इतर अपडेट करिता सोशल मीडियावर आमच्या संपर्कात रहा.